कुरवळ जावळी ग्रामदेवता श्री मानाई देवीचा ७ एप्रिल रोजी वार्षिक जत्रा उत्सव

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कुरवळ जावळी गावातील श्री मानाई देवीची जत्रा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र कृष्ण पक्ष पंचमी या मुहूर्तावर दि. ७ एप्रिल रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा, सकाळी ९ ते १० वाजता लाटेची पुजा व लाट पाडणे, सकाळी १० ते १२ वाजता लाटेची मिरवणूक, दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वाजता लाट बगाडावर चढविणे, रात्री ९.३० ते १०.३० निमंत्रित पालख्यांचे आगमन, स्वागत,पालखी भेट, रात्री १०.३० ते १२ वाजता निमंत्रीत पालख्यांसह श्री मानाई मातेचा छबिना, रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशा. जत्रेचा सोहळा पाहण्यासाठी सहकुटूंब, सहपरिवार, मित्र मंडळी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. कुरवल जावळी ग्रामस्थ, श्री मानाई देवी देवस्थान कमिटी आणि सभासद व कुरवळ जावळी ग्रामविकास मंडळ मुंबई, पुणे यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे.