आडारी मेन रोड ते मार्गेश्वर मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ 

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन 2025-26 अंतर्गत मालवण शहर आडारी मेन रोड ते मार्गेश्वर मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले असून सुमारे 4 लाख 6 हजार निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी दिली.

 

कामाच्या भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक महेश कोयंडे, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, रवी मालवणकर यांसह अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.