सिंदूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शीळचे घवघवीत यश

कुमार यूग गणेश वाडकर इयत्ता तिसरी हा रत्नागिरी तालुक्यात पाचवा
रत्नागिरी:
सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ,शीळ तालुका रत्नागिरी, या ग्रामीण भागातील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा कुमार युग गणेश वाडकर यांने संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातुन पाचवा क्रमांक पटकावला आहे.(गोल्ड मेडल) तर मिश्री अमोल सनगरे इयत्ता तिसरी (ब्रांझ मेडल) कुमारी तनिष्का बंडू बसरे, इयत्ता सहावी (सिल्व्हर मेडल) तसेच देवांग किशोर पवार, सौम्या कमलेश पाटील, अनन्या सत्यराज पवार, इयत्ता तिसरी , कु.विधी विजय मोहिते ,इयत्ता दुसरी, कु.आस्था कमलेश पाटील, इयत्ता सहावी यांनी सुयश संपादन केले आहे.जानेवारी २०२६ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री. ज्ञानेश वाडकर ,अध्यक्ष , शाळा व्यवस्थापन समिती व सर्व सदस्य ,शीळ .श्री. विजय देसाई, श्री. संदीप नाचणकर , शुभम कदम, विनायक कदम, प्रसन्न करंदीकर (अजय) , यांनी विशेष बक्षीस देऊन अभिनंदन केले. तसेच सौ. मेघा कांबळे , केंद्रप्रमुख मिरजोळे , श्री मकसूद सय्यद , मुख्याध्यापक, सौ. स्मितांजली जाधव, सौ. वृषाली नाचणकर, मार्गदर्शिका, श्रीमती अर्चना वारकरी, उपशिक्षिका, श्रीमती देसाईबाई सर्व पालक ग्रामस्थ माजी विद्यार्थी संघ शीळ, शिरगाव प्रभागातील सर्व शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्री स्वामी समर्थ मंगल
कार्यालय साळवी स्टाप रत्नागिरी येथे श्री संदेश सावंत, युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरणाचा सोहळा अतिशय दिमाखदार पणे संपन्न झाला.