ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे ग्रामस्थांनी जे प्रेम दिले त्याची परतफेड कधीच होणार नाही तुम्ही एखाद्या कामा साठी अवश्य हाक मारा ते काम 100 टक्के करण्याचा माझा प्रयत्न असेल त्यामुळे कधीही निसंकोच आपल्याकडे या मी आपल्या साठी सदैव तत्पर असेन असे मनोगत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी करमळगाळू येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच या वाडीत आयोजित हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सरपंच दाजी गावकर त्याच प्रमाणे पंचायत समिती सदस्य उत्कर्षां गावकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करत या वाडीच्या सर्वांगीण विकासा साठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावरील मान्यवर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य उत्कर्षां गावकर, सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ग्रा. पंचायत सदस्य लावण्या तावडे,ग्रा. सदस्य प्रशांत बुराण, ग्रा. पंचायत सदस्य मनाली गावकर,रवींद्र म्हापसेकर, गावप्रमुख रवींद्रनाथ गावकर,सगुण गावकर,सुनील मेस्त्री,उमेश गावकर, उमेश म्हापसेकर, बंड्या केळकर, गोविंद देवधर, विठ्ठल गावकर, शशी गोसावी, प्रमोद गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, नरेंद्र कवीटकर,वायरमन समीर सावंत,पत्रकार महेश चव्हाण, स्वप्नील उपरकर, विश्वनाथ बोर्ये, सिद्धेश कलिंगण,आदिसह व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. या वाडीत प्रथमच दाजी गावकर यांच्या संकल्पनेतून, सहकार्यातून आणि वाडीतील ग्रामस्थांच्या सहाय्यातून भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करमळगाळू ग्रामस्थ यांच्यासह अर्जुन तावडे, चंद्रकांत नाईक गजानन रासम, गोरखनाथ भुते, अनंत तावडे, विजय तावडे, राजा तावडे, प्रदीप राणे गिरीधर नाईक, सुदेश तावडे, हृषी तावडे, सदाशिव गावकर, प्रवीण म्हापसेकर, राहुल तावडे, शाम तावडे आदिसह या वाडीतील महिला वर्गांचे मोठे सहकार्य लाभले.या कार्यक्रमानंतर खास ग्रामस्थासाठी आयोजित कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या गोमय गणेश या दशावतार नाट्य प्रयोगाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी तावडे यांनी तर आभार अक्षय तावडे यांनी मानले.
Home सिंधुदुर्ग ओटवणे करमळगाळू ग्रामस्थांनी हक्काने हाक मारा. सदैव तत्पर असेन.जि. प.सदस्य विक्रांत सावंत












