राणे साहेबांनी दिलेल्या संधीच सोन करा : जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना आमदार नितेश राणे यांच्याकडून शुभेच्छा..
वेंगुर्ले: प्रतिनिधी
आम्ही राणे कुटुंब सर्वांना आमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणूनच बघतो. वाईट दिवसात जे कार्यकर्ते आमच्या मागे ठामपणे उभे होते त्यांना कधीच विसरणार नाही आणि म्हणून आज मनिष दळवी यांच्यासाठी इथपर्यंत आलो. बँकेवरचे तुमचे काम, मेहनत जवळून पाहतोय २०२६ पर्यंत बँक आपल्याकडे आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या कुटुंबाना उभं करत असताना आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. आलेली पद ही तात्पुरती असतात. पण आपले पाय हे जमिनीवर असले पाहिजेत. ज्या वेळी संघर्ष करत होतो त्यावेळी समजलं माणस किती महत्वाची असतात. आज ही गर्दी पाहून भारावून गेलो. त्यामुळे राणे साहेबांनी दिलेल्या संधीच सोन करा अशा शुभेच्छा आमदार नितेश राणे यांनी मनिष दळवी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा वाढदिवस मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातून उपस्थित मान्यवरांनी मनिष दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी या सोहळ्याला खास मुंबईतुन अचानक उपस्थित राहत दळवी याना सरप्राईज दिले.
यावेळी या वाढदिवस कार्यक्रमाला गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, राजेंद्र म्हापसेकर, व्हिक्टर डान्टस, डॉ. कुलकर्णी, शीतल आंगचेकर, पूनम जाधव, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, एकनाथ नाडकर्णी, विद्याधर परब, प्रमोद गावडे, रवींद्र मडगावकर, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सुहास गवंडळकर, प्रसन्ना देसाई, शर्वाणी गावकर, पंकज पेडणेकर, महेश सारंग, रवींद्र परब, दिपलक्ष्मी पडते, आनंद शिरवलकर, बाबली वायंगणकर, मोहिनी मडगावकर, ज्ञानेश्वर केळजी, आनंद शिरवलकर यांच्यासाहित अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत मनिष दळवी याना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनिष दळवी मित्रमंडळाचे कमलेश गावडे, राहूल पै, नितीन चव्हाण, वसंत तांडेल, भूषण सारंग, बाबली वायंगणकर, बबलू आवळेगावकर, श्रीकृष्ण परब, एम जी मातोंडकर, ओंकार गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. यावेळी जिल्ह्याचे चित्र पालटण्याची ताकद मनिष दळवी यांच्याकडे आहे. सर्व कठीण प्रसंगात मनिष दळवी शांत, स्थिर व ठाम राहिले त्यामुळे या यशाच्या शिखरावर ते पोचू शकल्याचे यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. तर यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
*संजू परब :* समोरची गर्दी बघितल्यावर आज मनिष दळवी यांनी जे कमावलं ते दिसतंय. माझ्या राजकीय जीवनाला खरी कलाटणी दिली ती मनिष दळवी यांनी. २००९ मध्ये मला काँग्रेसचा युवक तालुकाध्यक्ष करण्यात दळवी यांचा मोठा वाटा होता. ही माझ्या जीवनातील महत्वाची आठवण आहे, असे सांगत संजू परब यांनी मनिष दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.











