मेंदूतील गाठीच्या चर्चांवर कुटुंबाची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमुळे संभ्रम
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. काही पोस्टमध्ये त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या पत्नीने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. कांबळी सध्या बरे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे त्यांच्या आरोग्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या ढासळत्या प्रकृतीबाबतचे व्हिडिओ, फोटो आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारताकडून 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळलेले कांबळी काही काळापासून आरोग्याच्या कारणामुळे चर्चेत आहेत.
अलीकडेच त्यांच्या मित्र मार्कस कौटो यांनी कांबळीच्या मेंदूत गाठ असल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले की, या समस्येमुळे कांबळीच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे आणि तो काही गोष्टी लक्षात ठेवून नंतर विसरतो.
मात्र, कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया हेविट यांनी हे सर्व दावे स्पष्टपणे फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, कांबळी पूर्णपणे ठीक असून त्यांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे.
कौटो यांनी यापूर्वी सांगितले होते की, ठाण्यातील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कांबळीच्या मेंदूत गाठ निर्माण झाली. तसेच त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असल्याचा दावा त्यांनी केला होता.
दरम्यान, डॉक्टर आदिल छागला यांच्या माहितीनुसार, कांबळीने मद्यपान सोडले असले तरी तो कधीकधी धूम्रपान करतो आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. सध्या तो चालण्यासाठी काठीचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे.











