रत्नागिरी : बंदर हद्दीतील मिरकरवाडा पोलीस चौकीजवळच्या समुद्रकिनारी एक काळ्या रंगाचा रबरी फेंडर वाहून आलेला आहे. हा फेंडर कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेचा असल्यास त्याबाबतची आवश्यक ती कागदपत्रे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ रत्नागिरी या कार्यालयास सादर करुन या विभागाच्या पूर्व परवानगीने घेवून जाण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी केले आहे.
हा फेंडर किनाऱ्याजवळ असल्याकारणाने लगतच्या संरक्षक भिंतीला तो आदळत आहे. सदरचा फेंडर हा समुद्रीमार्गाने वाहत आल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत पावसाळी हवामान व वादळी वारे असल्यामुळे सदर फेंडरच्या ठिकाणी पाण्यात जाणे, तसेच तो सुरक्षित ठिकाणी हलवणे शक्य होत नाही.
हा फेंडर कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेचा असल्यास त्याबाबतची आवश्यक ती कागदपत्रे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ रत्नागिरी या कार्यालयास सादर करुन या विभागाच्या पूर्व परवानगीने घेवून जाण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी केले आहे.












