श्री स्वामी समर्थ मठ गावखडी आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा

गावखडी/ वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी श्री स्वामी समर्थ मठ गाव खडी आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठ गाव खडी तर्फे स्वामी समर्थ पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
श्री स्वामी देवांचा पूर्ण कृपेने व गुरुमाऊली गुरुदेव दास दिगंबर महाराजांच्या आशीर्वादाने राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री स्वामी समर्थांची पालखी गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता येणार आहे
तसेच श्री स्वामी समर्थांची पालखी दर्शनाची वेळ सकाळी .11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत आहे तरी सर्व भाविकांनी श्री स्वामी समर्थ नामाचा गजर ,महाआरती, महाप्रसादाचा, लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदकुमार फोडकर , विश्वास फोडकर गुरुनाथ फोडकर यांनी केले आहे.