खेड शहरात वाहतूक कोंडी ची समस्या तीव्र

 

खेड(प्रतिनिधी) खेड बस स्थानक, वाणी पेठ ते बाजार पेठ मुख्य रास्ता होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच फेरिवाले, अनधिकृत मालविकणारे यांचेमुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत आहे. शहरात आधीच वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूककोंडीने कहर केला आहे. सतत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे खेड पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेने तसदी घेतलेली नाही.

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. केवळ मोजक्याच ठिकाणचे खड्डे बुजवत मार्ग सुस्थितीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. एसटी बसचालकांना बस स्थानक वळण घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात खड्डे पडल्याने व लगतचा मार्गही एका बाजूने खचत असल्याने समस्येत भर पडली आहे. काही वाहनचालक बेदरकारपणे वाहने हाकत असल्याने व वाहने कुठे कशाही अवस्थेत उभी करून ठेवत असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. या सर्व समस्यांवर ताबडतोब अमल होणे जरूरी आहे जेणेकरून पादचारी व नागरीकांना याचा नाहक ञास होणार नाही. मात्र दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे