मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर परीसर सुशोभीकरण साठी क वर्ग पर्यटन मधुन मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.या वेळी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,राजु परूळेकर महेंद्र चव्हाण, प्रवीण घाडीगावकर, सरपंच सौ दिव्या धुरी, उपसरपंच निखिल जाधव, स्वप्नील पुजारे, राजेश तांबे, सुभाष धुरी, जयराम धुरी, आत्माराम धुरी, अरुण मेस्त्री, डॉ श्यामसुंदर धुरी, प्रकाश मेस्त्री, गंगाराम धुरी, रमेश पाताडे,खांबल,पो.पा.संदेश धुरी, गणेश धुरी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष कींजवडेकर,दया हाटले, विलास धुरी, भगवान जाधव,दशरथ जाधव, चंद्रसेन धुरी, हेमंत धुरी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विनोद रावले यांच्या सह राठीवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मंजूर सुशोभिकरण कामाच्या शुभारंभानंतर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार गावाच्या वतीने करण्यात आला.
यानंतर राजु परुळेकर, महेंद्र चव्हाण, सुभाष धुरी, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.खास.नारायणराव राणे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री नीतेश राणे साहेब,आम.निलेशजी राणे साहेब या सर्वांच्या सहकार्याने हे काम मंजूर झाले असून या पुढेही राठीवडे सह या जि.प.व.पं.स.मतदार संघातील विकास कामे अग्रक्रमाने घेतली जातिल.राठीवडे गाव ८०%भाजपमय झाला असल्याने आम्ही राठीवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत असेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले आहे.या विभागातील आपली पक्षसंघटना जोमाने वाढवा केंद्रापासून गावच्या ग्रामपंचायती पर्यंत आपलीच सत्ता असल्याने आपण विकासात कोठेही कमी पडणार नाही मात्र मंजूर झालेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी बोलताना सांगितले. या मंदिर क वर्ग पर्यटन मधून सुशोभिकरण साठी रुपये १५ लाख मंजूर करण्यात आले आहेत. या वेळी माजी उपसरपंच बाळा धुरी, प्रकाश खांबल, गुरुदास पांचाळ, भिकाजी कींजवडेकर, नारायण जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हेमंत धुरी यांनी केले.













