मध्यप्रदेशात खून करून रत्नागिरीत पळाले; शहर पोलिसांच्या तावडीत अलगद सापडले

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी

मध्यप्रदेश राज्याच्या झाबुवा जिल्हयातील खून प्रकरणातील तीन संशयितांच्या शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रत्‍नागिरी जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या. या दोन्ही संशयितांना पुढील तपासाकरता मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दाउद सन ऑफ चिलिया वाकला, नब्बू सन ऑफ चिलिया वाकला,चिलिया सन ऑफ कलिसिंग वाकला (सर्व रा.झाबुवा मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. मध्यप्रदेश येथे खूनाचा गुन्हा घडल्यापासून संबंधित संशयित आरोपी फरार होते. या त्‍यांना पकडण्यासाठी विषेश पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक शनिवारी रत्‍नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत संशयितांना अटक केली.

ही कारवाई पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर,शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील व पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे,सहाय्यक पोलिस फौजदार दिपक साळवी,पोलिस हवालदार भालचंद्र मयेकर,पोलिस काँस्टेबल निलेश शिंगावे यांनी केली आहे.