Assam : आसामध्ये भाजपची हॅटट्रिक, एकहाती विजय

मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.

ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये एकाच टप्प्यात ८० टक्के मतदान झाले होते. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यांसारख्या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक गाजली. आसाममध्ये १२६ जागांच्या विधानसभेत ६४ जागा हा बहुमताचा आकडा आहे. सद्यस्थितीत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने महाआघाडी करून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे.