सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड

मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील एनसीसी विभागातील कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (महाराष्ट्र सुरक्षा बल) मध्ये निवड झाली आहे.

चंदन कोळेकर हा शांत स्वभावाचा कष्टाळू तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून आपल्या करिअरवर त्याने लक्ष केंद्रित केले होते. भरती होणे हे एवढेच त्याचे टार्गेट होते. यासाठीच त्यांनी स. का. पाटील कॉलेजच्या एनसीसी विभागांमध्ये प्रवेश घेतला होता. त्याच्या प्रयत्नाला यश आले आहे. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन एम. आर. खोत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सेक्रेटरी गणेश कुशे, सर्व विश्वस्त मंडळ, कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर कॉलेज सर्व प्राध्यापक वर्ग तसेच सर्व एनसीसी कॅडेट यांनी चंदन कोळेकर यांचे अभिनंदन केले.

एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचा लाभ स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या विभागाला होत आहे. कॉलेजच्या एनसीसी विभागाचा आलेख वाढत आहे. अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी दिली.

फोटो : चंदन कोळेकर