बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी : रत्नागिरी मधील चांदोर येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्या प्रकरणी संशयावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीची रत्नागिरी मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये घडलेल्या या घटनेमध्ये संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे कामी संशयित आरोपी अशोक धोंडू तोडणकर याला अटक करण्यात आली होती.
सदर प्रकरणी लोकअभिरक्षक कार्यालय रत्नागिरी, जिल्हा न्यायालय रत्नागिरी चे सहाय्यक लोकअभिरक्षक (असिस्टंट डिफेन्स कौन्सिल) ॲड.पल्लवी परशुराम धोत्रे यांनी आरोपीची बाजू मे.कोर्टासमोर परिणामकरित्या मांडली. ॲड.पल्लवी परशुराम धोत्रे यांनी केसचे कामी घेतलेला उलटतपास व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.के यादव साहेब यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या कामी त्यांना लोकअभिरक्षक कार्यालय रत्नागिरी चे उपमुख्य लोकअभिरक्षक ॲड.अजित वायकुळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्याच कार्यालयाचे सहाय्यक लोकअभिरक्षक ॲड.यतीन धुरत, ॲड. आयुधा देसाई,ॲड. उन्मेश मुळ्ये यांनी सहकार्य केले.