अंगणवाडी मिनी सेविका/मदतनीस पदभरतीसाठी आवाहन

चिपळूण (प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, एबाविसेयो, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांचेकडील पत्रक्र.एबाविसेयो/अंगणवाडी/का-७/५११/२०२३, दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडिल पत्र. ४९६/२३, दिनांक ३ मे २०२३ नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प -२ चिपळूणकडील खालील नमुद केलेल्या अंगणवाडी मदतनीस या पदासाठी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी इच्छूक व आवश्यक अर्हता धारकांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तालुक्यातील मजरेकाशी उर्दु, खोपड, वडेरू, कुडप धनगर, वीर बौध्दवाडी, वीर देवपाट, वारेली याठिकाणी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे आहेत. अधिक माहितीसाठी जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा.