ओटवणे (प्रतिनिधी ) राजा शिवाजी विद्यालय विलवडे या प्रशालेचा यावर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १००टक्के एवढा लागला असून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही प्रशालेने कायम राखत घवघवीत यश मिळवले प्रशाले मधून एकूण 34 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या प्रशाले मधून गोविंद राजन दळवी या विद्यार्थ्याने ८८. ४० टक्के गुण मिळवत प्रशालेमधून प्रथम क्रमांक मिळविला, सलोनी प्रकाश गवस या विद्यार्थिनीने ८७ टक्के एवढे गुण मिळवत प्रशाले मधून द्वितीय क्रमांक पटकावला तर जानवी उमेश नाईक हिने ८४. ६० टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बुध्दभूशण हेवाळकर,स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.













