मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा ५ वा वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सकाळी ८:०० वा.: श्री गणेश पूजन व अग्रपूजन.
सकाळी ८:४५ वा.: महाअभिषेक, हवन विधी आणि धार्मिक कार्यक्रमांचा प्रारंभ.
दुपारी १:०० वा.: महाआरती.
दुपारी १:३० वा.: महाप्रसाद (भंडारा).
सायंकाळी ७:०० वा.: सायंकाळची महाआरती.
सायंकाळी ७:२० वा.: स्थानिकांची सुश्राव्य भजने.रात्री ८:०० वा. पालखी सोहळा.
रात्री ८:५० वा.: आनंदी महिला मंडळ देऊळवाडा यांचा ‘कृष्णलीला’ कार्यक्रम.
रात्री ठीक १०:३० वाजता “इथेच संपली ना-ती?” हा सामाजिक नाट्यप्रयोग यावेळी सादर केला जाणार आहे.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.













