वेंगुर्ले : दाजी नाईक
मातृदिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले येथील एका रांगोळी कलाकाराने निशब्द,… श्वास थांबला पण आईचं मातृत्व नाही… या टॅगलाइन खाली.. जबलपूर येथील क्रूज दुर्घटना यामध्ये आईने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलाला सोडलं नाही स्वतःचा जीव गेला पण लेकराची साथ नाही सोडली. सलाम त्या आईच्या प्रेमाला.. हे दृश्य साकारणारी रांगोळी साकारली आहे… हे दृश्य एक जेष्ठ व्यक्ती निशब्द होत पहात आहे अशी रांगोळी साकारत मातृदिनाच्या दिवशी एक आगळीवेगळी आदरांजली.. व मातेच्या प्रति असणारे भाव या रांगोळीतून वेंगुर्ले येथील रांगोळीकार रघुनाथ उर्फ पिंट्या कुडपकर यांनी आपल्या रांगोळीकलेतून साकारले आहेत. आपल्या वेंगुर्ले भटवाडी कॅम्प येथील आपल्या गणपतीच्या चित्र शाळेत ही रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी त्याला १७ तास कालावधी लागला..
Home ताज्या घडामोडी मातृदिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले येथील रांगोळी कलाकार रघुनाथ कुडपकर याने साकारली आगळीवेगळी रांगोळी…













