चौके पंचक्रोशितील सुमारे ५० जेष्ठाचा बँ.नाथ पै मालवण-कट्टा सेवांगणाच्या वतीने सत्कार
चौके – प्रतिनिधी : थोर संसदपटू बँ.नाथ पै यांच्या, जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं चौके गावातील तसेच पंचक्रौशितील बँ.नाथ पै चे सहकारी व समाज कार्यकर्ते यांचा बँ.नाथ पै सेवांगण मालवण- कट्टा यांच्या वतीने चौके येथील जि.प.शाळा नंबर १ येथे सुमारे ५० जेष्ठाचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.यावेळी कट्टा सेवांगणाचे प्रमुख किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर,दीपक भोगटे,मालवण सेवांगणाचे प्रमुख लक्ष्मीकांत खोबरेकर,नितीन वाळके आदि बँ.नाथ पै.च्या कार्याने प्रेरित झालेल्या मान्यवरांच्या हस्ते उपस्थित बँ.नाथ पै.चा सहवास लाभलेले जेष्ठ सहकारी- कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुन समाजसेवकांचा शाल श्रीफळ व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कट्टा सेवांगणाचे किशोर शिरोडकर,दीपक भोगटे,यांच्यासह आर.जी चौकेकर,मोहन चव्हाण,सदाशिव गावडे,बिजेंद्र गावडे,नितीन वाळके लक्ष्मीकंत खोबरेकर यांनी बँ.नाथ पै मधु दंडवते यांच्या आठवणीना उजाळा दिला.बँ नाथ पै,प्रा.मधु दडंवते,बापूभाई शिरोडकर,श्यामराव कोचरेकर यांचे त्याकाळातील कोणतीही सोईसुविधा नसताना समाजवादी विचारसरणीने आपल्या कोकणासाठी केलेले कठीण कार्य ..त्यांच्यावर असलेला कोकणातील जनतेचा प्रचंड विश्वास त्यातून घडलेलेला आपल्या कोकणचा विकास हे कधीही विसरण्यासारखे नाही.त्याकाळी असणारे ८०% समाजकारण आणि २० % राजकारण आता दिसत नाही याची खंत उपस्थित मान्यवरानी व्यक्त केली .बँ.नाथ पै यांच्यामुळेच चौके पंचक्रौशितील हायस्कुल ची इमारत आज उभी आहे.अश्या थोर व्याक्तीमत्वाचा सहवास लाभलेल्या बँ.नाय पै च्या जन्मशताब्दी निमित्ताने झालेला सत्कार आणि आठवणी जेष्ठाना आनंददायी तर उपस्थित तरुणाना प्रेरणादायी ठरला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चौके जेष्ठ नागरीक सदाशिव गावडे-गुरुजी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले..