गुहागर एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे मुख्याध्यापक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ मराठी विषय समितीचे सदस्य ,गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ मनोज पाटील यांची नुकतीच गुहागर केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री महेशजी भोसले साहेब यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.त्यावेळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री संदीपजी भोसले ,हायस्कूल कमिटीचे अध्यक्ष संचालक श्री दीपक कनगुटकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे सर, संचालक श्री पराग भोसले, उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम, अपंग संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग ,सुरभी भोसले ,इतर कर्मचारी उपस्थित होते .त्यावेळी बोलताना संदीप भोसले म्हणाले मनोज पाटील यांच्या केंद्रप्रमुख निवडीमुळे शिक्षणाचे सावित्रीकरणाला गती प्राप्त होणार आहे.मनोज पाटील यांचे गुणवत्ता विकासातील कार्य व शैक्षणिक प्रदीर्घ अनुभव हे मोलाचे ठरणार आहे .दीपकजी कनगुटकर यांनी यापुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी योगदान मोलाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.संस्थेचे अध्यक्ष श्री महेशजी भोसले साहेब यांनी मनोज पाटील यांच्या केंद्रप्रमुख निवडीबाबत समाधान व्यक्त केले .मनोज पाटील यांचा सन्मान करणे ही बाब आम्हा सर्व प्रशालेच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.