कोकण रेल्वेकडून अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेची घोषणा

मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत १३ मे २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले.

 

मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे

 

गाडी क्रमांक ०११०६ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष रेल्वे रविवार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.

 

तर गाडी क्रमांक ०११०५ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे सोमवार, १८ मे २०२६ रोजी पहाटे ५.४५ वाजता पनवेल येथून सुटणार असून त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे.

 

ही विशेष रेल्वे करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

 

या रेल्वेमध्ये एकूण २३ डबे असणार असून त्यात ३ एसी थ्री टियर, ११ स्लीपर, ७ जनरल तसेच २ एसएलआर/डी डब्यांचा समावेश आहे.

 

गाडी क्रमांक ०११०६ साठी आरक्षण प्रक्रिया १४ मे २०२६ पासून पीआरएस केंद्रे, इंटरनेट तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नर्कर यांनी दिली.