अनिल सरमळकरांच ‘ इट्स ऑलरेडी टुमारो ‘

२५ ऑगस्ट रोजी होणार प्रकाशित.

लुमा जाधव(ओटवणे) ‘ The Fox ‘ फेम नाटककार अनिल जिजाबाई सरमळकर यांचे दुसरे इंग्रजी नाटक
‘ Its Already Tomorrow ‘येत्या २५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे
प्रकाशित होत आहे. मुंबई फोर्ट येथील ‘ Horizon Books ‘ प्रकाशनाचे उदयोन्मुख प्रकाशक विक्रम केवाडिया यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. सोबतच याच पुस्तकात अनिल सरमळकर यांचे इंग्रजी दिर्घांक इंग्रजी नाटक ‘ Desire of Darkness ‘ प्रसिद्ध होत होत आहे.
‘ द फॉक्स ‘ या अनिल सरमळकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या नाटकाला अभूतपूर्व प्रसिद्धी व यश मिळाले तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील नामवंत रंगकर्मी, समीक्षक,विचारवंत, लेखक, दिग्दर्शक इत्यादीनी तसेच अमेरिकन,ब्रिटीश रंगभूमी व विद्यापीठ पातळीवर या नाटकाची दखल घेतली आणि The fox हे नाटक जागतिक रंगभूमी व साहित्यात मैलाचा दगड ठरले आहे.

तथापि अनिल सरमळकर यांचे ‘Its Already Tomorrow’ हे दुसरे इंग्रजी नाटक Horizon Books प्रकाशित करीत असुन त्या बद्दल बोलतांना अनिल सरमळकर म्हणाले ” हे ही नाटक अत्यंत वेगळे आहे,तेॲब्सर्ड शैलीतीलच आहे मात्र या नाटकाला जागतिक कविता, तत्वज्ञान, कला, साहित्य इत्यादीचे खुप संदर्भ असुन हे नाटक मानवी समाज आणि संभाव्य सार्वत्रिक अराजक या बद्दल बोलणारे gibrrish पध्दतीचे नाटक आहे. ते फक्त अतार्कीक असबद्धच नाही तर ते काही सांगु पाहत आहे त्याचे संदर्भ अगदी ग्रीक महाकाव्यापासुन युरोपियन साहित्य लॅटिन अमेरिकन साहित्यापासुन भारतीय साहित्यापर्यंत खोल गुंतलेले आहेत त्यामुळेच हे नाटक  The fox च्याही कित्येक पावले पुढे जाणारे असुन ते वाचक, प्रेक्षक आणि दिग्दर्शक रंगकर्मी यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक आहे ” असे सांगून ते पुढे म्हणाले की “द फॉक्स च्या त्रिनाट्यधारेतील हे दुसरे नाटक असले तरी त्याचे कथानक किवा सारांश यामध्ये The fox नाटकाशी कोणतेही साम्य नाही तर ते एक स्वतंत्र वेगळे नाटक आहे मात्र या नाट्यत्रयी मधे एक संभाषित आहे त्याचा जो अंतस्वर आहे तो एक आहे आणि तो काही एक भाष्य करु पाहत आहे. दरम्यान या नाटकाची प्रकाशकपुर्व संहीता अमेरिका इंग्लंड ग्रीक येथील विद्यापीठे तसेच नामवंत समीक्षक विचारवंत इत्यादींपर्यंत पोहचले असुन अनेक मान्यवरांचे अभिप्राय प्राप्त होत असुन हेही नाटक आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यास भाग पाडेल आणि हे नाटक भारतीयच नव्हे तर जागतिक साहित्यात खळबळ निर्माण करेल असे त्याचे स्वरुप व नाट्यबंध आहे त्यातील संदर्भ तर मोठ मोठ्या विद्वानांना घाम फोडणारे ठरत आहेत असे अभिप्राय नामवंत व्यत करीत आहे.

या नाटकासोबतच या पुस्तकात अनिल सरमळकर यांचे दिर्घांक इंग्रजी नाटक ( short play )
‘Desire of Darkness’ प्रकाशित होत आहे.
दरम्यान ‘ Its Already Tomorrow’ नाटकाचे प्रकाशन २५ ऑगस्ट रोजी मुंबईत होत असुन The fox नंतर हे नाटक काय इतिहास निर्माण करतेय याकडे रंगभूमी आणि साहित्य क्षेत्राचे लक्ष लागले आहेत.