मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवी वर्षपुर्ती सोहळ्याचे औचीत्यसाधून 12 ऑगस्ट 2023 रोजी भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात सकाळी 10.00 वाजता देशभक्तीपर समुह व वैयक्तीक गीत गायन स्पर्धा व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, संदीप राजपूरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी वर्गाची उपस्थित लाभणार आहे. तालुक्यातील तीसहून अधिक संघानी यंदाच्या स्पर्धेत सहभागी नोंदवीला आहे स्पर्धक व नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार यांनी केले आहे.










