२५० हून अधिक शिल्पकारांचा कुटुंबासह गौरव; विविध बक्षिसांचे वितरण
कुडाळ : ओम एजन्सीज कुडाळ पुरस्कृत ‘सन्मान शिल्पकारांचा २०२६’ हा भव्य-दिव्य कार्यक्रम दि. १५ मे २०२६ रोजी महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री दत्त एजन्सी चिपळूण अंतर्गत कार्यरत असलेल्या १२ सहयोगी फर्मच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिल्पकार व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री दत्त एजन्सी चिपळूणचे मालक, कृषी सम्राट तथा उद्योजक श्री. वसंतशेठ उदेग, कुडाळ येथील प्रसिद्ध व्यावसायिक जीवराजभाई पटेल, श्री सिमेंट कंपनीचे लोके साहेब तसेच विसाका इंडस्ट्रीजचे मोर्ये साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ओम एजन्सीज कुडाळचे पार्टनर श्री. किशोर लांबे, दयाळ उदेग व अश्विन पटेल उपस्थित होते. तसेच रत्नागिरी येथून श्री. शार्दुलशेठ लांबे, संदीपशेठ उदेग, सूरजशेठ शिंदे आणि डॉ. चेतन कदम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
ओम एजन्सीज कुडाळ यांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिकाधिक बिल्डिंग मटेरियल खरेदी करून स्कीमअंतर्गत पॉईंट्स मिळवण्याची संधी दिली जाते. यावर्षी तब्बल २५० हून अधिक ग्राहकांनी या स्कीममध्ये सहभाग नोंदवत विविध आकर्षक बक्षिसे प्राप्त केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सन्मान शिल्पकारांचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये जवळपास २५० हून अधिक शिल्पकारांचा त्यांच्या कुटुंबासह विशेष सत्कार करून विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना श्री. वसंतशेठ उदेग यांनी शिल्पकारांना अधिकाधिक मटेरियल खरेदी करून पुढील वर्षी आणखी मोठी बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न करावा, तसेच पुढील वर्षीही संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन केले.












