महसूल तर्फे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांना अभिवादन

आचरा | अर्जुन बापर्डेकर : क्रांती दिनानिमित्त आचरायेथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या हस्ते पुष्प चक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तलाठी संतोष जाधव, पोलीस कर्मचारी तांबे, पोलीस पाटील विठ्ठल धुरी,जगन्नाथ जोशी,कोतवाल गिरीश घाडी तसेच इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.