आचरा | अर्जुन बापर्डेकर : देशाच्या सीमांचे रक्षण करत असताना देशहेच आपलं कुटुंब मानून काम करत असल्याने कुटुंबाच्या आठवणीत व्याकूळ होण्यासाठी उसंतच मिळत नसल्याचे मत आचरा देवूळवाडी येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त सैनिक निलेश भोसले, सचिन पुजारे यांनी रामेश्वर वाचन मंदिरात व्यक्त केले.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचराने क्रांती दिन आणि ‘माझी माती माझा देश ‘ या अभियानाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन, पंचप्रण शपथ इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सैनिक भोसले आणि पुजारे यांच्या हस्ते केले गेले.
यावेळी आपले अनुभव कथन करताना ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भि सळे, उपाध्यक्ष अशोक कांबळू कार्यवाह अर्जुन बापर्डकर, सदस्य सौउर्मिला सांबारी,श्रीमती वैशाली सांबारी, जयप्रकाश परूळेकर , भिकाजी कदम, दिपाली कावले, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी,कामिनी ढेकणे,श्रद्धा महाजनी,यांसह कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी आचरे गावातील निलेश भोसले व सचिन पुजारे या दोन माजी सैनिकांचा ज्ञानेश्वरी व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष .बाबाजी भिसळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमाचे महत्व विशद केले. उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी उपस्थित माजी सैनिकांची मुलाखत घेऊन त्यांचे थरारक प्रसंग उपस्थितांना ऐकविले. क्रांतिदिनाचे महत्वही कांबळी यांनी विशद केले. सदस्या सौ. उर्मिला सांबारी यांनी क्रांतिकारक कै.नारायण सांबारी (त्यांचे वडील ) यांचे काही थरारक प्रसंग उपस्थितांना ऐकविले. कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी आभार मानले .सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी यांनी केले.












