सावंतवाडी । प्रतिनिधी : सातार्डा
येथील रहिवासी आणि निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे आज रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे वडील होत. विशेष म्हणजे, अलीकडेच त्यांच्या आईचे देखील निधन झाले होते. या दुःखद घटनेने पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
माजी सैनिक चंद्रकांत पवार यांनी देशसेवेत आपले मोलाचे योगदान दिले होते. हवालदार पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते गावात सामाजिक कार्यात सहभागी असायचे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, बहिणी, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक २५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात असून, पवार कुटुंबाच्या दुःखात ग्रामस्थ व पत्रकार बांधव सहभागी झाले आहेत.













