नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर येथे 12 वी तील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

राजापूर (वार्ताहर): शहरातील नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ. 12 वी च्या फेब्रु. 2026 च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नवजीवन हायस्कूलच्या सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष सुलतान ठाकूर यांचे अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.
यावेळी संस्था सचिव मजीद पन्हळेकर, सदस्य अशफाक काझी आदि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु. 2026 चा निकाल 02.05.2026 वी ऑनलाइन जाहिर झाला होता. मूळ गुणपत्रके तथा प्रमाणपत्र विभागीय मंडळाकडून नुकतीच प्राप्त झाल्यावर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन करण्यात आला.
यावेळी 12 वी तील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे कु. सविहानाझ खान 70.33 टक्के, सिध्दी घाडी 65.17 टक्के वृंदा दुधवडकर : 63.83 टक्के तसेच वाणिज्य मध्ये कु. मैथिली देवरुखकर: 83.67 टक्के, मयुरेश लोळगे 82.67 टक्के, साहिल गिजम:79.33 टक्के व कला शाखेतील प्रथम पियुष गोर्ले: 69.67 टक्के, सानिका घाडी 68.50 टक्के व कु. नसीम सोलकर :63.00 टक्के यांना संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेतील प्रा. कमलेश जाधव, समिर मुल्ला, शफिक वाघू तसेच यशस्वी विद्याथ्यांसह त्यांचे पालक उपस्थित होते.