पंडित दिनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान

मालवण चौके येथे भव्य जिल्हा प्रदर्शनी : अभियानचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : पंडित दिनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचा जिल्हा प्रशिक्षण वर्ग चौके मालवण येथील द नॅनीज ग्रॅड रिसॉर्ट येथे नुकताच संपन्न झाला. याठिकाणी सिंधुदुर्ग भाजपा कडून भव्य प्रदर्शनी मांडण्यात आली. यामध्ये मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती दिली होती. तसेच “पार्लमेंट टु पंचायत” पर्यंत झालेला संघटनेचा विस्तार, या सोबतच जिल्यातील भाजप सरकारने राबविलेल्या महत्त्वाच्या योजनाचा सामावेश होता. तसेच जिल्ह्यात झालेली आंदोलने व ऐतिहासीक घटना ह्या ही प्रदर्शनीत मांडण्यात आल्या. राज्यस्तरावर प्रतिनीधीत्व करत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भाजपा नेते यांचीही माहिती प्रदर्शीनी मध्ये मांडण्यात आली.
प्रदर्शनीची मांडणी मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर व त्यांच्या टीमने उत्कृष्ठ रीत्या करुन सर्वांची दाद मिळवली.

या प्रदर्शंनीचे उद्घाटन आमदार योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकुर, महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व अभियानाच्या प्रदेश सहसंयोजीका प्रा. वर्षा भोसले, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी आमदार योगेश सागर यांनी भाजप सिंधुदुर्ग चे कौतुक केले, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भाजप सर्व अभियान राबविताना महाराष्ट्रात अव्वल स्थानावर असतो या बद्दल जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व सर्वांच्या कामगिरीचे कौतुक केले. आम. प्रशांत ठाकूर यांनी ही या प्रदर्शनीच्या संकल्पनेचा मागोवा घेताना मोदी सरकारची कामगिरी जनमानसात लोकप्रिय आहे असे नमूद केले.

या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व १४ मंडल वर्ग पुर्ण होऊन, जिल्हा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. जिल्हाभरातील १ हजार ११५ कार्यकर्ते मंडल प्रशिक्षणात सहभागी झाले होते. याबाबत प्रा. सौ. वर्षा भोसले यांनी कौतुक केले. तर जिल्हा प्रशिक्षण वर्गात १३६ कार्यकर्ते सहभागी झाले.

या प्रदर्शनीची पालकमंत्री नितेश राणे, विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, मुंबई भाजपा सरचिटनिस राजेश शिरवडकर, भाजपाचे गोवा राज्याचे प्रदेश प्रवक्ते जयंत जाधव, प्रदेश सोशल मिडीयाचे सागर भदे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अभिजीत सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, अभियानाचे सहसंयोजक सौ. संध्या तेरसे, प्रमोद रावराणे, श्रीकृष्ण उर्फ राजु परब, जेष्ठ नेते राजु राऊळ, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, महेश सारंग, संदिप साटम तसेच प्रशिक्षणातील सर्व लोकप्रतीनीधी व पदाधिकार्यांनी पहाणी केली व कौतुक केले.