सुप्रसिद्ध दिवाकर भास्कर बागवे यांच्या पखवाज वादनाने श्री देव राधाकृष्ण मंदिरातील महाआरतीला अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त !

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात विष्णू अवतार श्रीकृष्णाच्या भक्तीरसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यानिमित्ताने श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट येथे चालू अधिक श्रावण मासानिमित्त दररोज महिनाभर महाआरती सुरू आहे. भैरी भवानी प्रासादिक भजन मंडळ, गांगोवाडीचे सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री दिवाकर भास्कर बागवे यांच्या पखवाज वादनाने भाविक तल्लीन होतात. त्यांच्या नियमित विविधांगी पखवाज वादनाने बालगोपाळ मंडळाच्या आरतीला सात्विक अध्यात्मिक व्यासपीठ लाभले आहे.आणि पुरुषोत्तम मासातील श्रीकृष्णाच्या भक्तीला वेगळे परिमाण लाभले आहे. त्यांच्या या सेवेबद्दल मंडळाच्या संचालकांनी त्यांचे आभार मानले आहेत. पखवाज वादनासह महाआरती मध्ये अबाल वृद्ध,शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि युवाई मोठ्या संख्येने,वेळेवर उपस्थित राहून प्रत्येक जण आपली सेवा श्री चरणी अर्पण करीत आहे. त्याचबरोबर विविध व्यक्तींकडून महाआरतीसाठी प्रसादाचेही नियोजन केले जाते. एकंदरीत महिनाभर चालणाऱ्या या महाआरतीचा उत्साह प्रत्येक दिवशी द्विगुणीत होत आहे…