आचरा | अर्जुन बापर्डेकर : अमेय इलेक्ट्रिक चिंदरच्या सहकार्याने
मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथे कृषी यांत्रिक उपकरणांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी
किर्लोस्कर ब्रदर्स लि. रिटेलर चे वितरण अधिकारी आशिष हाके यांनी शेतकऱ्यांना
किर्लोस्कर कंपनीच्या विविध अवजारांची माहिती, विश्वासार्हता व नवीन
वॉटरपंप प्रॉडक्ट यां बाबत माहिती दिली.याला
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांना कृषी साहित्य भेट देण्यात आली.
यावेळी नारायण परब, सचिन जाधव, प्रमोद परब,
निलेश रेवडेकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, सुनिल
पाताडे, नितीन घाडी, संतोष घाडी, संतोष मुळये,
जनार्दन घाडी, राजेंद्र घाडी, दिलिप परब आदी शेतकरी
ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.












