सर्वसाधारण सभेत स्वच्छतेची चर्चा सुरू असतानाच दिसत होते हे चित्र
रत्नागिरी । प्रतिनिधी:
रत्नागिरी जिल्ह परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वच्छता अभियानाबद्दल जोरदार चर्चा झाली. एका सदस्यांने तर सभागृहात दिलेली प्लास्टिकची पाण्याची बाटली यापुढे देऊ नये, थर्मासचा वापर करावा अशी मागणीही केली, बेंच वाजवून त्याचे कौतुक झाले. मात्र एकीकडे स्वच्छतेबद्दल सभागृहात सुरू होती तेव्हा मात्र एका सदस्याने त्याला स्वच्छतेबद्दल किती कळवळा आहे हे प्रत्यक्ष दाखवले. चक्क पाण्यासाठी देण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या पायाखाली फेकून दिल्या, हळूहळू त्या पायाने पुढे पुढे जात होत्या. यामुळे सभागृहाच्या स्वच्छतेचा प्रश्न सुद्धा उपस्थितीत होत होता. यालाच दिव्याखाली अंधार अशी चर्चा सभागृहात सुरू होती













