मुंबई : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई सीएसएमटी–मडगाव (गाडी क्रमांक ०११७३) विशेष एकमार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही विशेष गाडी रविवार, १४ जून २०२६ रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल. ही गाडी पुढील दिवशी पहाटे १.३० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचणार आहे.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
गाडीमध्ये एकूण १६ डबे असणार असून त्यामध्ये ३ एसी चेअर कार, १० चेअर कार, १ एसी व्हिस्टाडोम चेअर कार, १ एसएलआर आणि १ जनरेटर कारचा समावेश आहे.
प्रवाशांनी गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या माहितीसाठी ‘केआर मिरर’ अॅप डाउनलोड करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.












