शिक्षक संदेश तुळसणकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 

वैभववाडी l प्रतिनिधी :      वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक संदेश तुळसणकर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन वेदिक रिसर्च अकादमीतर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

संदेश तुळसणकर हे तालुक्यातील उंबर्डे गावचे सुपुत्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संदेश तुळसणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी जपत जनजागृती, शैक्षणिक प्रबोधन आणि समाजहिताच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ॲकॅडमीने त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल केला.

मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने तुळसणकर यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.