डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजमध्ये पार पडला युवा महोत्सव
चिपळूण ( वार्ताहर) : मुंबई विद्यापीठ आयोजित उत्तर रत्नागिरी विभागाचा ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव -२०२३-२४ हा यजमान महाविद्यालय डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी-पालवण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड या पाच तालुक्यातील एकूण २१ महाविद्यालयातील ४५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होऊन ३५ स्पर्धा प्रकारामध्ये उज्वल यश संपादन केले.
युवा महोत्सवात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या अंगीकृत असणाऱ्या गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. यातूनच भविष्यात सांस्कृतिक,क्रीडा व इतर क्षेत्रात अनेक कलाकार निर्माण होतात व त्यांच्या पायाभरणीसाठी प्रत्येक कॉलेजमधून किंवा विद्यापीठामार्फत होणारे या स्पर्धा किंवा असे महोत्सव विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरतात.
मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ. राजेंद्र मोरे, सहाय्यक सांस्कृतिक समन्वयक डॉ. राजेश राजम यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. या युवा महोत्सवाला परिक्षक म्हणून संजय तोडणकर, राहुल वैद्य, दिगंबर राणे, प्रकाश पटवर्धन, गीता निखर्गे, भरत साळवे, रामनाथ कटोरे, रघुनंदन बर्वे, अक्षोभ भारद्वाज, रवींद्र दुरुगकर, विवेक दहिवलकर, वैष्णव चव्हाण, अंजली तळेकर, मार्टिना पारशर, प्रणित मावळे, योगेश नाईक, सुनिता तांबे, महेश देशमुख, संचिता कोल्हापटे, आशिष नाईक, प्रसन्न जोशी, नितीन केणी, साधना म्हात्रे लाभले होते.या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे , प्राचार्या मा. सौ. अंजलीताई चोरगे, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.टी.जाधव, ज्यूनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन तांबेकर, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक सौ. नंदा कांबळे, संचालक मंडळ, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी खुप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.








