चिपळूण ः तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना शिरगांव येथील नामांकित श्री. स्वामी समर्थ फाउंडेशनच्या वतीने चिपळूण तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. विविध घटकातील उल्लेखनिय संस्था आणि व्यक्तींना श्री स्वामी समर्थ पुरस्कार’देऊन सन्मानीत केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाइन स्वरूपात प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुका स्तरावर उल्लेखनीय कामकाजासाठी चिपळूण रत्न पुरस्कार, ४ उत्कृष्ट मुख्याध्यापक / प्राचार्य पुरस्कार (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सीनियर कॉलेज), उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार – ४ ( प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सीनियर कॉलेज), उत्कृष्ट शाळा व व्यवस्थापन पुरस्कार -४
(प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सीनियर कॉलेज), कृषिरत्न पुरस्कार (उल्लेखनीय उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी), उत्कृष्ट रुग्णालय/ क्लिनिक पुरस्कार – ३ (30 बेड आतील/ 30 बेड च्यावरील रुग्णालय), शिक्षक रत्न पुरस्कार – ६ (अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,सिनीअर कॉलेज), शिक्षक रत्न पुरस्कार – २ (खाजगी कोचिंग क्लासेस इयत्ता .पहिली ते दहावी /पदवीधर वर्ग), उद्योग रत्न पुरस्कार ( किमान ५० लोकांना रोजगार देणारे उद्योजक), कृषिउद्योग रत्न पुरस्कार (कृषी पूरक उद्योग), समाज रत्न पुरस्कार (उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था), आरोग्यरत्न धन्वंतरी पुरस्कार – ८ (वैद्यकीय व्यावसायिक – BHMS,BAMS,MBBS,BDS, NURSING, PHARMACIST/LAB TECHNICIAN व आशा सेविका), उत्कृष्ट अभियंता पुरस्कार, उत्कृष्ट मूर्तिकार, युवारत्न पुरस्कार ( महाविद्यालयातील उल्लेखनीय कार्य), क्रीडारत्न पुरस्कार, गुणवंत कामगार पुरस्कार -४ ( एमआयडीसी, एमएसईबी, एस.टी, खाजगी व निमशासकीय कर्मचारी) समाजभूषण रत्न पुरस्कार, ( समाजासाठी उल्लेखनीय कामकाज), उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – २ ( प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक), उत्कृष्ट बँक -२ (नागरी बँक, सहकारी, अर्बन, पतसंस्था), उत्कृष्ट कला व सांस्कृतिक -२ ( गायन, नृत्य , नाटक, लघुपट, चित्रपट, संगीत), असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप- महावस्त्र, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व मानाचा फेटा असे आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव समन्वयक
एस. आर. यादव यांना 9421021840 या व्हॉटसअप नंबरवर अथवा shankarryadav11@g mail.com या ईमेलवर पाठवावेत. जेपीजी अथवा पिडीएफ फाईल पाठवावी. प्रस्ताव हार्ड कॉपी पाठविण्याची आवश्यकता नाही. प्राप्त प्रस्तावांची छाननी केल्यानंतर पुरस्कार वितरणाची तारिख जाहीर केली जाणार आहे.










