कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांची कोकण आयुक्तांसमवेत बैठक

कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्यउपाध्यक्ष संदीप कदम यांनी मांडले प्रश्न

कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची कोकण विभागिय आयुक्त यांच्या समवेत सहविचार सभेत झाली. अनुकंपा मधील भरती, कंत्राटी कर्मचारी , शिक्षक व कर्मचारी भरती आदी विविध धोरणात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोकण विभागिय आयुक्त मा .डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या दालणात बैठक संपन्न झाली . सदर वेळी
कास्ट्राईब संघटनेच्या वतीने अतिरिक्त सरचिटणीस मा .श्री सुरेश तांबे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव (ठाणे ) कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्यउपाध्यक्ष संदीप कदम सिंधुदुर्ग, कोकण विभाग कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष संतोष गाढे, डॉ . बाळासाहेब चव्हाण , महासंघ कार्याध्यक्ष रत्नागिरी, कास्ट्राईब आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष संजय जाधव ,एस पी हांगे,एस सी गुरव व सागर धामोडे उपस्थित होते.

सदर वेळी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा मागासवर्गीय कर्मचारी व शिक्षक यांच्या सरळसेवा भरती प्रक्रिया बाबत अनुशेष आढावा घेण्यात आला . यावेळी विभागातील सर्व जिल्हा परिषदा यांनी जाहिराती प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले . सदर वेळी
जात पडताळणी प्रमाणपत्र नसलेल्या कर्मचारी, अधिसंख्य पदावरील कर्मचारी या बाबत भूमिका व कारवाई याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचार्यांच्या जातपडताळणी बाबत सक्त सुचना देण्यात आल्या .कास्ट्राईब संघटनेच्या वतीने कंत्राटी कर्मचारी आणि सफाई कामगारांना किमान वेतन व अन्य लाभ मिळावे ही मागणी केली असता मा कोकण आयुक्त यांनी मा कामगार आयुक्त यांच्या सोबत चर्चा करून या बाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे . शासकीय – निमशासकीय अनुकंपा तत्वावर कर्मचारी भरती चा आढावा यावेळी घेण्यात आला व कोकण विभागातील सर्व जिल्हा आस्थापना यांना सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी आदेश आयुक्त स्तरावरून काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .

कोकण विभागातील कर्मचार्यांच्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा झाली. वेतन वेळेत देण्यावर चर्चा झाली.ज्या मागासवर्गीय कर्मचारी यांचे निलंबन 3 महिन्यापासून अधिक काळ चालु असल्यास त्यांना सेवेत पून.स्थापित करून घेण्या बाबत मागणी व चर्चा करण्यात आली . सदर वेळी अशा अन्याय झालेल्या निलंबित कर्मचारी यांची यादी कास्ट्राईब संघटनेने द्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले .तसेच शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय प्रश्नाबाबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेला व कास्ट्राईब कर्मचारी महासंघास दर तीन व सहा महिन्यांनी बैठका देऊन प्रश्न निकाली काढण्यात यावेत असे लेखी आदेश यावेळी आयुक्त यांनी कोकण विभागिय प्रशासनाला दिल्या .बैठकीसाठी कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर, विवेक गायकवाड , उपायुक्त महसूल कोकण विभाग तसेच तहसिलदार विजय व्हटकर ,नायब तहसीलदार मृणाल कदम व आस्थापना विभाग अधिकारी उपस्थित होते .