कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई रमेश चव्हाण यांना ध्वजारोहनचा बहुमान.

कणकवली : स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक शासकीय कार्यालयात ३ दिवस ध्वजारोहन होणार असून आज पहिल्या दिवशी कलमठ ग्रामपंचायत मध्ये ३५ वर्षे शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या रमेश विष्णु चव्हाण यांना ध्वजारोहनाचा बहुमान सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कूडतरकर, सदस्य रविंद्र यादव, अनूप वारंग, दिनेश गोठनकर,प्रीति मेस्त्री,हेलन कांबळे,सचिन खोचरे,धीरज मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, स्वाति नारकर, नजराना शेख,प्रियाली आचरेकर, योगिता चव्हाण मुख्याध्यापक सावंत मॅडम,शिक्षक, कर्मचारी वृन्द, आशा व अंगणवाड़ी सेविका उपस्थित होते.