लांजा पोलिसांनी दिले पनवेल पोलिसांच्या माध्यमातून नातेवाईकांच्या ताब्यात
लांजा( प्रतिनिधी) पनवेल येथून घरातून पळून आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना लांजा पोलिसांनी आडवली रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेत पनवेल पोलिसांच्या माध्यमातून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. ही माहिती लांजा पोलिसांनी शनिवारी १२ ऑगस्ट रोजी पत्रकार यांना दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल कामोठे येथून दोघेजण अल्पवयीन मुले हे घरातून पळून आले होते. हे दोघेजण दिनांक १० ऑगस्ट रोजी आडवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्टेशन मास्तर गौतम गांधी यांना आढळून आली होती. याबाबत त्यांनी त्यांच्याकडे तिकिटाचे विचारणा केली असता त्यांच्याकडे तिकीट नव्हते .त्यामुळे स्टेशन वाजता गांधी यांना त्यांचा संशय आला. याबाबतची माहिती त्यांनी लांजा पोलीस स्टेशनला दिली. तसेच 112 नंबर वर माहिती कळवली होती.
त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या दोघांना ताब्यात घेऊन घेतले. लांजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी हे दोघे पनवेल कामोठे येथील असल्याची बाब उघडकीस आली. ल्यानंतर पोलिसांनी पनवेल पोलिसांची संपर्क साधला .यावेळी हे दोघे घरातून गायब झाल्याचा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पनवेल पोलिसांची संपर्क साधून या दोघाही अल्पवयीन मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.या कामी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरीष भोसले, हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे, एकता कदम, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार यांनी कामगिरी बजावली.










