मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुका पत्रकार संघ आयोजित दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी गवळी हॉल भिंगळोली येथे पार पडलेल्या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव या विद्यालयाने माध्यमिक गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. २०००/-₹ रोख, सन्मान चिन्ह, व प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. …विशेष म्हणजे उत्कृष्ट HARMONIUM COMPOSITION साठी LBSH चे सदस्य,माझी विद्यार्थी, संगीत क्षेत्रातील जाणकार, व प्राथमिक शिक्षक श्री.दिलीप मराठे गुरुजी यांच्याकडून विशेष 500/-₹ चे पारितोषिक प्राप्त झाले आहे…या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. इंगळे आर . व्ही. यांनी विशेष मेहनत घेतली. या यशाबद्दल *संस्था,शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, शिक्षक पालक संघ, शालेय समिती यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे..











