बांदा दाणोली मार्गावर चार चाकीचा अपघात

ओटवणे(प्रतिनीधी) बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला अचानक डुलकी लागल्याने चार चाकी रस्त्याच्या बाजूला जावून झाडीत कलंडली . MH 14 KS7291 या पिंपरी चिंचवड येथील गाडीचा अपघात झाला . पुणे येथून गोवा येथे गेलेले पर्यटक पुनः पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळी 11.30वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने ही गाडी काढण्याचे प्रयत्न सूरू होते पण गाडी बरीच खाली गेल्याने काढताना अडचणी येत होत्या.