चांद्रयान -३ च्या यशस्वी लँडिंग नंतर सावंतवाडीत जल्लोष…

चांद्रयान -३ च्या यशस्वी लँडिंग नंतर सावंतवाडीत जल्लोष…
फटाके व पेढे वाटून आनंद साजरा
भाजप युवा नेते संदीप गावडेंचा पुढाकार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरल्यानंतर भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या सहका-यांच्या माध्यमातून सावंतवाडी उद्यान परिसरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी तेथे जमलेल्या नागरीकांना पेढे वाटप करण्यात आले. यावेळी अनिकेत आसोलकर, हेमंत पांगम, चैतन्य सावंत,अभिषेक लाखे, मानसी पेडणेकर,ओंकार पुरलकर, किसन धोत्रे सचिन मोरजकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, चांद्रयान तीनच्या चंद्रावर उतरण्याच्या घटनेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रहार डिजिटल च्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी चंद्रयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरताच युवकांनी एकच जल्लोष केला.

आम्ही पोचलो डायरेक्ट चंद्रार ..
चांद्रयान-3च्या यशस्वी लॅंडिंगनंतर नागरिकांचा जल्लोष
सावंतवाडी । प्रतिनिधी : चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगमुळे भारताने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. यानंतर
सावंतवाडी शहरातील नागरिकांनी फटाक्यांची माळ लावत जल्लोष साजरा केला. बाजारपेठ भवानी चौक येथील रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिक, व्यापारी यांनी एकत्रीत आनंदोत्सव साजरा केला. जोरदार घोषणा देत भारत मातेचा जयघोष केला. तर चांद्रयान मोहीमेतील सर्व शास्त्रज्ञ व टीमच त्यांनी अभिनंदन केलं आहे.
भारतीयांसाठी अभिमानाचा असा हा क्षण असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शैलेश गवंडळकर, साबाजी नार्वेकर, शंभू विर्नोडकर, अशोक डामरेकर, मनोहर माणगावकर, सौ.प्रतिक्षा परब, प्रसाद नार्वेकर, संजय सावंत, किशोर कानसे, आसिफ शेख, बापू धुरी, मनोज वारंग आदी भवानी चौक मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग नंतर सावंतवाडी शहर भाजपकडून जल्लोष
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारताच्या चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर सावंतवाडी शहर भाजपच्यावतीने येथील कार्यालयासमोर फटाके फोडून व विजयी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष संजू परब व भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला.
यावेळी तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, परिक्षत मांजरेकर, बंटी जामदार, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.