
मंडणगड | प्रतिनिधी : आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हयाचे मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाचे सुरुवात 12 ऑगस्ट 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथून करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक’ परिसरातील पवित्र माती ताम्र कलशात संकलित करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमास गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर ,महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रसाद मांडवकर, मंडणगड तालुका अध्यक्ष विश्वदास लोखंडे, कार्याध्यक्ष आप्पा मोरे , गिरीष जोशी , दादा कोकाटे , काजल लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तहसीलदार तानाजी शेजाळ, गटविकास अधिकारी विशाल जाधव, मंडल अधिकारी प्रकाश साळवी, तलाठी मनोहर पवार, ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते. या निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्यासह ग्रामस्थ सुदाम सकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले आभार महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मानले.










