माहिती मिळाल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
कणकवली : शहरातील शिवाजीनगर, कणकवली येथील अलका अनंत साळवी (वय ७५) या बेपत्ता झाल्याची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि २५ जून रोजी सकाळी सुमारे ७ वाजता अलका साळवी या त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नसून नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे. अलका साळवी यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास अथवा त्या कुठे आढळून आल्यास तात्काळ कणकवली पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२३६७-२३२०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.













