राजापूर (वार्ताहर): सन २०२५-२६ राष्ट्रीय पातळीवरील झालेल्या इंडियन टॅलेंट ओलिंपियाड परिक्षेत येथील नवजीवन हायस्कूल राजापूरच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.
वेगवेगळया विषयांवर आधारित हि स्पर्धा असते. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नवजीवन शाळेचे विद्यार्थी सहभाग घेतात व यश संपादन करतात. यावर्षी सुद्धा प्रशालेच्या पाचवी ते दहावी या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये यश मिळवून आपल्या बुद्धिमत्तेचे सुंदर प्रदर्शन केले आहे.
यामध्ये जरीन पडवेकर (प्रथम ६वी चित्रकला), हुरिया मुकादम (प्रथम), उम्मूलखेर नाखवा (द्वितीय), जरीन पडवेकर तृतीय सहावी गणित, जिया इमरान हवालदार (प्रथम आठवी हिंदी), सारा आसिफ वाघू (प्रथम हिंदी दहावी). याशिवाय इयत्ता नववीच्या जैनब वसीम वस्ता या विद्यार्थिनीने विज्ञान विषयात राज्यात क्रमांक पटकावून रोख पारितोषिक पटकावले.
तर इयत्ता सातवीच्या जईम खलिफेने विज्ञान विषयात उत्कृष्टतेसाठी पारितोषिक पटकावले. याशिवाय चित्रकला स्पर्धेत मरियम वाडकर, उमरा कोंडकर, हुरिया मुकादम, जैनब मगदूम ( सातवी) राज्यस्तरावर क्रमांक पटकावला आहे.
गणित विषयांमध्ये इयत्ता सातवीच्या खनसा दोस्ती, स्वालीहा बिद्री, आयेशा डिगणकर ,सफवान हाजू, साहिल मालीम, इलियाज मुजावर, अहमद कोंडकर तर विज्ञान विषयांमध्ये हुरिया मुकादम, जरीन पडवेकर, खनसा दोस्ती यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावला. हिंदी विषयात जरीन पडवेकर हुरिया मुकादम राज्यस्तरावर क्रमांक पटकावला.
इयत्ता आठवीच्या हिंदी विषयात लायबा फणसोपकर, इकरा इसफ, अक्सा खलिफे, सिमरन नाखेरकर, शिफा वाडकर, जुवेरीया वाडकर, अक्सा जवाहिरे यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले .तर नववीच्या आफिया गिरकर व अमिना नाखवा यांनी चित्रकला स्पर्धेत यश प्राप्त केले.
हिंदी विषयासाठी अमिना नाखवा, जैनब वस्ता, राबिया सय्यद, आफिया गिरकर सुमैया वाघू, मुसर्रत काझी यांनी क्रमांक पटकावला. माध्यमिक विभागाच्या तंझिमा काझी, झीनत महाडिक, उमरफारुक मुजावर, फरहान मुल्ला या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र व्हनमाने यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांना हे यश मिळाले.
या यशाबद्दल राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर व कार्यकारी मंडळातील इतर सदस्य यानी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.













