रत्नागिरी:
‘रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन’तर्फे १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी शहरात अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या ३१ नामवंत डॉक्टरांचा क्लबच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे उपस्थित डॉक्टरांसाठी आयोजित केलेले “Financial Fitness & Wealth Planning for Doctors” हे मार्गदर्शनपर सत्र. यामध्ये प्रसिद्ध अर्थसल्लागार श्री. सुधीर भगत आणि श्री. दिवीज शिरवईकर यांनी अतिशय सोप्या भाषेत आणि सुंदर उदाहरणांसह फायनान्स व गुंतवणुकीचा योग्य मेळ कसा साधावा, याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. हे सत्र सर्वच डॉक्टरांसाठी अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरले. व्याख्यानानंतर सर्व उपस्थितांनी सहभोजनाचा (स्नेहभोजनाचा) आनंद घेतला.
सेवा, मैत्री आणि ज्ञानाचा सुंदर संगम!
नवीन रोटरी वर्ष २०२६-२७ ची सुरुवात या स्तुत्य उपक्रमाने झाली आहे. या कार्यक्रमाची उत्कृष्ट आखणी रोटरी मिडटाउनचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. श्री. संदीप करे यांनी केली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या १५ सदस्यांनी नियोजन, समन्वय आणि प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवला. या प्रसंगी रोटरी मिडटाउन क्लब तसेच इनरव्हील क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सांघिक सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला.
Home महत्वाच्या बातम्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा; ३१ डॉक्टरांचा विशेष...













