सावंतवाडी । प्रतिनिधी : आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नुकतीच शालेय स्तरावर आगळीवेगळी लोककला वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील २८ लोककला प्रकारातील विविध लोककला प्रकाराचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी करावे अशी या स्पर्धेची अट होती आणि यात तब्बल ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्पर्धा यशस्वी केली. चार गटांत हि स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेचे परीक्षण लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांनी केले. नेरूर आयडीयल इंग्लीश मिडीयम स्कूलचा लोककला वेशभूषा स्पर्धा उपक्रम स्तुत्य असुन लोककलेच्या संवर्धना साठी तो उपयुक्त आहे असे गौरवोद्गार यावेळी परीक्षक मनोगतात प्रा.खानोलकर यांनी व्यक्त करत
या लोककला वेशभूषा स्पर्धेची संकल्पना मांडणारे आणि ती यशस्वी पणे राबवणारे या विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक सौरभ पाटकर सर याचे विशेष कौतुक करत त्याच्या बरोबर काम करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह पालक विद्यार्थी यांच्या भरघोस प्रतिसादा बद्दल सर्वांचे यावेळी अभिनंदन केले.
यावेळी व्यासपीठावर नेरुर समृद्धी प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉ नंदिनी देशमुख , श्री राजीव नेरुरकर , पालक संघ उपाध्यक्ष श्री प्रसाद मठकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेसाठी परिक्षण करणारे लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर यांचा सत्कार डॉ नंदिनी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.वैभव खानोलकर यांचे दशावतारी लोककला संशोधन, विविधांगी लेख, मुलाखती, राज्यस्तरीय निवेदन,युवा व्याख्याता आणि एक उपक्रम अध्यापक अशी विविधांगी क्षेत्रात त्यानी आपलं सिध्द केलेले कर्तृत्व हे निश्चित च आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणारे असुन प्रा खानोलकर सारख्या बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आज समाजाला गरज असल्याची हि भावना या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या डॉ नंदिनी देशमुख यांनी व्यक्त करत प्रा वैभव खानोलकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
राज्यस्तरीय सुत्रसंचलना सोबतच ते वक्तृत्व, निबंध, कथाकथन, काव्य वाचन, काव्य लेखन, नृत्य, पारंपरिक लोककला स्पर्धा, चित्र रथ देखावा, वेशभूषा या विविध स्पर्धांचे परिक्षणासाठी त्याना राज्य स्तरावर विशेष आमंत्रित केले जाते.
नेरूरच्या आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी नेरुर गावचे कला प्रेमी लोक ,पालक, आदी सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.










