भिरवंडेत माजी सैनिक पत्नी श्रीमती सुजाता सावंत यांना ध्वजारोहणचा मान

कणकवली:वार्ताहर : भिरवंडे ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सांगतां निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी गावातील माजी सैनिक कै.श्रीधर विश्राम सावंत यांच्या पत्नी श्रीमती सुजाता श्रीधर सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा सन्मान करताना भिरवंडे सरपंच नितीन सावंत व ग्रामस्थांनी श्रीमती सुजाता सावंत यांना हा बहुमान दिला.सुजाता सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या मातोश्री आहेत.तर आरोग्य उपकेंद्र येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश घाडीगावकर तर भिरवंडे शाळा नंबर 1येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा. प.सदस्य मिलिंद पवार,अंकिता सावंत,रश्मी सावंत,दीक्षा सावंत,केंद्रप्रमुख श्री.सुयवंशी,मुख्याध्यापक प्रियांका सावंत,जगन्नाथ गावकर,बाळकृष्ण सावंत, अक्षता सावंत, माजी सैनिक कुटुंबीय,विशाल सावंत, कृषीकेश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते