राजापुरात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे वीज पुरवठ्यावर विघ्न

तालुक्यात तब्बल ८५ विजखांब कोसळले तर ७५ ठिकाणी विजवाहिन्या तुटल्या
महावितरणकडून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ

राजापूर प्रतिनिधी : तालुक्यात ३ जुलै पासून चालू झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने महावितरणला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यात महावितरणचे तब्बल ८५ विद्युत पोल उन्मळून पडले असुन वेगवेगळया भागात ७५ ठिकाणी विजवाहिन्या तुटुन पडल्या आहेत. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले असून महावितरणकडून या सर्व ठिकाणी पोल उभे करून व विजवाहिन्या जोडून विजपुरवठा पर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन दिवसात तालुक्याच्या सर्व भागात विजपुरवठा सुरळीत सुरू होईल असा दावा महावितरणने केले आहे.
तालुक्यात ३ जुलै पासून चालू झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने महावितरणला दणका दिल्या आहेश्. विजवाहिनी नजीक असणारी झाडे उन्मलून पडलयामुळे अनेक ठिकाणी पोल पडले तसेच तारा तुटून पडल्या. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागला आहे. राजापूर -१ उपविभागामध्ये एकूण ७१ पोल पडले व एकूण ४५ ठिकाणी तारा तुटल्या तसेच राजापूर -२ उपविभागामध्ये एकूण १४ पोल पडले व एकूण ३० ठिकाणी तारा तुटल्या. सदर पडलेले पोल अथवा तारा व्यवस्थित करून वीजपुरवठा सुरळीत करणेस १ ते दोन दिवसाचा कालावधी लागला. सद्यस्तिथीत अद्यापही एकूण १५ पडलेल्या पोलची उभारणी करून वीजपुरवठा करणे प्रलंबित आहे. तसेच अद्यापही पोल पडण्याच्या घटना चालूच असलेने वीजपुरवठा पूर्ववत करणेस विलंब लागू शकतो असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
सदर पोल पडणे, तारा तुटणे तसेच उच्चदाब वीज वाहिनीवर झाडे अथवा झाडाच्या फांद्या पडल्यानंतर वाहिनी उपकेंद्रातून बंद होते अथवा माहिती मिळालेनंतर ती बंद ठेवावी लागते. तसेच उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून बंद झालेस एकदा परत चालू करून बघितली जाते पण चालू झाली नसलेस वाहिनी ची पाहणी करून काही फौल्ट आढळलेस तो दूर करून वाहिनी पुरवत चालू केले जाते. सदर काम करणेस वेळ लागत असतो परिणामी पूर्ण वाहिनी अथवा काही भाग बंद राहतो. कोकणामध्ये पाऊसाचे प्रमाण भरपूर असते तसेच बऱ्याच वाहिन्या जंगलातून जात असलेने आपल्याकडे वाहिन्या बंद होण्याचे प्रमाण थोडे जादा राहते. पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यापासून देखभाल दुरूस्तीची कामे केली जातात त्यामध्ये वहिनींना लागणारी झाडाच्या फांद्या तोडल्या जातात. परंतु वाहिनीजवळ असणारी मोठी झाडे तोडता येत नाहीत.
महावितरण मार्फत सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच ठेकेदार यांचे कर्मचारी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी तेथील परिस्थिती मुळे विलंब झाला आहे. महावितरणची सर्व यंत्रणा आपल्या सेवेसाठी अथक प्रयत्न करीत आहे असेही महावितरणचे राजापूर -१ व राजापूर -२ या विभागांचे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.