ओरोस येतील नीलू आंगणे यांची गळफास घेऊन आत्महत्या.

ओरोस येतील नीलू आंगणे यांची गळफास घेऊन आत्महत्या.

सिंधुनगरी प्रतिनिधी

ओरोस देऊळवाडी येथील निलेश रामदास आंगणे उर्फ नीलू आंगणे वय 27 याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शेती आणि अन्य व्यवसाय असलेल्या सधन कुटुंबातील हा अविवाहित नीलू साधा सरळ स्वभावाचा म्हणून अनेकांचा मित्र होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना समजतात ओरोस परिसरात शोककळा पसरली. रिक्षा व्यवसायिकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून तर ओरोस परिसरातील दुकानें बंद ठेवून शोक व्यक्त केला.
बुधवारी दुपारी जेवणानंतर आई वडील झोपत असलेल्या खोलीत झोपायला जातो असे सांगत त्याने अडीज वाजण्याच्या दरम्यान त्यांना गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दोन वाजल्यानंतर तो घराशेजारीच असलेल्या आपल्या चाळीतील रूममध्ये झोपायला जातो असे सांगून गेला होता. आजी व त्याचा भाऊ सिद्धेश याने नीलू बाहेर दिसत नसल्याने शोधा शोध सुरू केली. त्यातून एक खोली आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. नंतर त्या खोलीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.

रिक्षा व टेम्पो व्यवसाय तसेच शेतीचे कामे करणारा तरुण ओरोस परिसरात अनेकांचा चाहता होता. येथील व्यावसायिक रामदास आंगणे यांचा तो छोटा मुलगा होता.